दिनांक 09 December 2019 वेळ 10:48 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोटच्या मुलीच्या नकारानंतर मनोरकरांनी केले मृत महिलेवर अंत्यसंस्कार

पोटच्या मुलीच्या नकारानंतर मनोरकरांनी केले मृत महिलेवर अंत्यसंस्कार

MANOR ANTYASANSKARमनोर/प्रतिनिधी, दि. 23 : मृत आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोटच्या मुलीने गुजरातहुन येण्यास नकार दिल्याने मनोरच्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी त्या मृत महिलेचे अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडवले.

मनोरच्या हायस्कुल डोंगरी भागात दहा वर्षांपासून राहणार्‍या निरुबेन पटेल (60) यांचा काल, बुधवारी आजारपणामुळे मृत्यू झाला. अहमदाबाद येथे राहणारी त्यांची एकुलती एक मुलगी आणि जावयाला याबाबत माहिती देण्यात आली. मात्र मुलीने आईवर अंत्यसंस्कार करण्यास येण्यास असमर्थता दर्शविली आणि मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करत मृत आईचे अंतिम दर्शन घेतले. तसेच अंत्यसंस्कारानंतर अस्थी कुरियरने अहमदाबादला पाठवण्यास सांगितले.

ही माहिती दिलीप देसाई आणि शमीम खान यांना कळताच त्यांनी मनोरमधील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हातनदिशेजारील स्मशानभूमीत या मृत महिलेचे अंत्यसंकार केले. काल, बकरी ईदचा सण असूनही मुस्लिम बांधवांनी या महिलेचे अंत्यसंस्कार करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमध्ये हिंदु-मुस्लिम एकता आणि माणुसकीचे दर्शन घडवले.

MANOR ANTYASANSKAR1अंत्यसंस्कारावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय दातेला, बिलाल रईस, किसन भुयाळ, समीर खान, राकेश कुमावत, ए. एस. राणे, राकेश वाडीकर आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top