दिनांक 22 August 2019 वेळ 3:14 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » उप मुख्य कार्यकरी अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात जिल्ह्यातील ग्रामसेवक सामूहिक रजेवर

उप मुख्य कार्यकरी अधिकाऱ्याच्या नियुक्तीविरोधात जिल्ह्यातील ग्रामसेवक सामूहिक रजेवर

LOGO-4-Onlineवार्ताहर
बोईसर, दि. २१ : पालघर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आलेल्या अशोक पाटील यांच्यावर भ्रष्टाराचाराचे आरोप करत या नियुक्तीला विरोध म्हणून जिल्ह्यातील ग्रामसेवक कालपासून सामूहिक रजेवर गेले आहेत. तर आदिवासी एकता परिषदेने व आदिवासी संघटनेने या नियुक्तीचे स्वागत केले .

गोंदिया जिल्ह्यातील गटविकास अधिकारी अशोक पाटील यांची नुकतीच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकरी पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आहे. पाटील यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनांनी पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांची नेमणूक केल्यास आदिवासी बाहुल पालघर जिल्ह्याचा विकास होण्याऐवजी भकास होण्याचा आरोप केला आहे. पाटील यांनीही काम केलेल्या तालुक्यातील ग्रामसेवकाकडे मोठ्या रकमेच्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण न झाल्याने ग्रामसेवकाना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देता तडकाफडकी निलंबनाची कारवाई करून त्यांचे कौटुंबिक आयुष्य उध्दव केलेले आहे . तसेच ग्रामपंचायतीच्या परस्पर खरेदी विक्रीत गैरव्यवहार, महिलांशी गैरवर्तणुक असे अनेक आरोप ग्रामसेवक संघटनांनी केले आहेत तर डहाणू व मोखाडा या तालुक्यमध्ये अशोक पाटील यांनी गटविकास अधिकारी म्हणून काम केले असून जिल्ह्यातील आदिवासी गाव पाड्याची तसेच तसेच मच्छिमार समाज व शेतकरी यांची इतनभूत माहिती असल्याने अश्या कार्यतत्पर असलेल्या अधिकाऱ्याला आदिवासी भागाची काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत आदिवासी एकता परिषदेने त्यांचे स्वागत केले आहे

comments

About Rajtantra

Scroll To Top