दिनांक 26 September 2018 वेळ 9:56 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

20180816_110008प्रतिनिधी

वाडा, दि. २१ : तालुक्यातील नव्याने तयार करण्यात आलेल्या भिवंडी-वाडा-मनोर, कुडूस-कोंढले, कुडूस-चिंचघर,सापरोंडे-अचाट, मोहोट्याचापाडा-उसर व डाकीवली फाटा- डाकीवली या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असुन अक्षरशः चाळण झालेली पहावयास मिळत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्वाभिमान संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
 तालुक्यातील रस्त्यांबाबत स्वाभिमान संघटना गेले अनेक वर्षं वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधून घेत आहे. परंतु खोटी अश्वासन देऊन आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही या निवेदनात केला आहे. सिमेंट काँक्रीट केलेल्या रस्त्यांना भेगा पडल्या आहेत. तर डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन संपुर्ण डांबरच वाहुन गेली आहे. या रस्त्यांच्या संबंधीत ठेकेदार व अधिकाऱ्याची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच संबंधीत रस्ते दहा दिवसांच्या आत दुरुस्त न केल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेश पाटील व तालुका अध्यक्ष रविंद्र मेणे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top