दिनांक 17 July 2019 वेळ 3:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : शिरोशी ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक स्वच्छता पुरस्कार

जव्हार : शिरोशी ग्रामपंचायतीला स्व. वसंतराव नाईक स्वच्छता पुरस्कार

SHIROSHI GRAMPANCHAYAT SWATCHTA PURASKAR1जव्हार, दि. 19 : तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायतीला पालघर जिल्हा परिषदेमार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार अंतर्गत जिल्हास्तरीय स्व. वसंतराव नाईक स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला असुन पालक मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते नुकतेच ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले. पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व सांडपाणी व्यवस्थापन आदि निकषांवर हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असुन शिरोशी गावचे सरपंच रघुनाथ महाले, उपसरपंच सुनील रंधा व ग्रामसेविका मीरा वाघमारे यांना हा पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, उपाध्यक्ष निलेश गंधे व सभापती अशोक वडे आदि मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top