दिनांक 23 April 2019 वेळ 5:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तारापूर अणुऊर्जा केंद्रातील सत्यदेव आर्य यांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान

तारापूर अणुऊर्जा केंद्रातील सत्यदेव आर्य यांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान

SATYADEV AARYAबोईसर, दि. 19 : तारापूर अणुऊर्जा केंद्रातील औद्योगिक सुरक्षा दलाच्या कमांडंट पदी कार्यरत असलेल्या सत्यदेव आर्य यांनी विविध पदावर कार्यरत असताना पार पाडलेली कामगिरी पाहून नवी दिल्ली येथे नुकतेच राष्ट्रपती पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) विभागात कार्यरत असलेल्या देशातील 23 अधिकार्‍यांना 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पदक देऊन गौरव करण्यात आले. त्यात सत्यदेव आर्य यांचा समावेश आहे. मूळचे सोनपत हरियाणाचे रहिवासी असलेल्या सत्यदेव आर्य यांनी बीएस्सी व ऍडव्हान्स डिप्लोमा इन सॉफ्टवेअर ऍप्लीकेशनचे शिक्षण घेतले आहे. ते 1998 मध्ये सीआयएसएफमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विमानतळ सुरक्षा तसेच संगणक प्रशिक्षण सुरक्षा यंत्रणेत सुधारणा आदी विभागामध्ये काम केले आहे. सन 2008 मध्ये संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सच्या शांतता सेनेच्या भारताच्या पथकामध्ये ते सहभागी झाले होते.

देशातील पहिल्या सीआयएसएफ आयटी कॉन्टिमेंट स्थापनेमध्येही त्यांचा सहभाग होता. वीस वर्षाच्या त्यांच्या सेवेमध्ये विविध संवेदनशील ठिकाणाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळताना त्यांनी तांत्रिक सल्लागार, ऑडिटर, समुपदेशक, प्रशिक्षक तसेच युनिट कमांडंट अशा विविद पदावर जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, आर्य यांना यापुर्वी संयुक्त राष्ट्राचे शांती पदक तसेच इतर विभागीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top