दिनांक 30 May 2020 वेळ 9:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » इस्त्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील शाळेचा कायापालट

इस्त्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील शाळेचा कायापालट

WADA ISRAIL VIDYARTHI1वाडा, दि. 19 : विविध क्षेत्रातील 40 इस्त्रायली विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील शाळा नंबर-2 या जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसात या विद्यार्थ्यांकडून शाळेचा कायापालट करण्यात येणार आहे. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व नगरसेवक मनिष देहेरकर, गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव तसेच रोहन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या इस्त्रायली विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

वाड्यात दाखल झालेले हे 40 इस्त्रायली विद्यार्थी जगभरात दौरे करत असून विविध देशातील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करत आहेत. यावेळी त्यांनी भारत देशाचा दौरा करण्याची परवानगी इस्त्रायल सरकारकडे मागितली होती. त्यावर इस्त्रायल सरकारने भारत सरकार सोबत चर्चा केल्यानंतर भारत सरकारकडून या दौर्‍याला परवानगी देण्यात आली व महाराष्ट्रातील आदिवासी भागाचा दौरा करण्याचे निश्चित करण्यात आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच थ्री सिक्स्टी (360) फाऊंडेशनचे चेअरमन रोहन ठाकरे यांनी या दौर्‍यासाठी पालघर जिल्ह्याची निवड कारण्यासंदर्भात इस्त्राईल दूतावासासोबत चर्चा केली. यानंतर टीमच्या काही सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचा सर्वे केल्यानंतर वाडा शहरातील शाळा नंबर-2 ची निवड करण्यात आली व शनिवारी (दि. 18) या 40 इस्त्रायली विद्यार्थ्यांची संपूर्ण टीम येथे दाखल झाली.

WADA ISRAIL VIDYARTHIभारतीय शिक्षण पद्धती तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा हि मुले अभ्यास करणार असून जिल्हा परिषद शाळा क्रमांक्र 2 या शाळेचा कायापालट हि मुले करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग घेणे, शाळेची रंगरंगोटी करणे, मुलांना खेळण्यासाठी गार्डन तयार करणे तसेच खेळाचे साहित्य व विज्ञान विषयाशी संबंधित विविध उपकरणे इस्त्रायल सरकारकडून या शाळेतील मुलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या स्वागत समारंभा दरम्यान इस्त्राईल विद्यार्थी टीमचे प्रमुख लिओन तौली यांनी या दौर्‍याचा उद्देश सांगितला. तर नगरसेवक मनिष देहेरकर यांनी वाडा जिल्हा परिषद शाळेची या स्तुत्य उपक्रमासाठी निवड केल्याने नगर पंचायत व वाडा शहराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

comments

About Rajtantra

Scroll To Top