वाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;

0
15

पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

Untitled-1बोईसर, दि. 17 : भाजपाचे जेष्ठ नेते व माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे काल, सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे त्यांना श्रद्धांजली म्हणून पुकारण्यात आलेल्या भारत बंदला बोईसरवासियांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. तर पालघरमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
भारतीय राजकारणातील महान ऋषीतुल्य असे व्यक्तीमत्व असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या महानिर्वाणाने संपूर्ण देश हळहळला. त्यांच्या दुःखात पालघरमध्ये सर्व पक्षीय नागरिकांनी एकत्र येत पाचबत्ती येथे श्रद्धांजली वाहिली. मात्र पालघरमध्ये शुक्रवारचा आठवडा बाजार भरत असल्याने खेड्यापाड्यातील भाजी विक्रेते बाजारामध्ये दाखल झाले होते. तसेच रिक्षा व बसेस सुरू असल्याने येथे बंदला संमिश्र प्रतिसाद दिसुन आला. व्यापार्‍यांनी मात्र आपली दुकाने बंद ठेवत बंद पाळला. तर बोईसर येथे सर्व व्यापार, रिक्षा व बसेस बंद असल्याने कडकडीत बंद दिसुन आला. वाहतूक सेवा बंद असल्याने तारापूर एमआयडीसीमधील कामगारांनी पायपीट करत कारखाने गाठले. दरम्यान, आज शुक्रवार असल्याने बहुतेक कारखाने देखील बंद होते. त्यामुळे बोईसरमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला.

Print Friendly, PDF & Email

comments