दिनांक 30 May 2020 वेळ 9:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अविरत देशसेवेचे व्रत घेतलेला नेता हरपला -विष्णू सवरा

अविरत देशसेवेचे व्रत घेतलेला नेता हरपला -विष्णू सवरा

भाजपाच्यावतीने स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली

ATAL BIHARI VAJPEYEEवाडा, दि. 17 : आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व देशाला समर्पित केलेला नेता आज आपल्यातून निघून गेला असून अटलजींच्या जाण्याने भाजपाची नव्हे तर देशाची अपरिमित हानी झाल्याची प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केली. देशाचे माजी पंतप्रधान, कवी मनाचे लोकप्रिय नेते, संवेदनशील राजकीय नेतृत्व भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी यांचे काल, गुरुवारी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वाडा येथील भाजपा कार्यालयात त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना सवरा म्हणाले की, अटलजींच्या निधनाने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण देशाची अपरिमित हानी झाली असून ते देशभक्त अजातशत्रू कवी व प्रसंगी कणखर नेतृत्व करणारे नेते होते. हे संपूर्ण देशाने अनुभवलेले आहे. आज अटलजी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरतील, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण रोठे व अरविंद भानुशाली यांनी अटलजींच्या आठवणी जागविल्या.

यावेळी भाजपा प्रदेश सदस्य बाबाजी काठोळे, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ पाटील यांच्यासह भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. तालुका अध्यक्ष संदीप पवार, वाडा नगर पंचायतीचे नगरसेवक मनीष देहरकर व रीमा गंधे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली वाडा येथील भाजपा कार्यालयात अटलजींच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश केणे, उप तालुका प्रमुख तुषार यादव, वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, उप नगराध्यक्षा उर्मिला पाटील, गटनेते संदीप गणोरे यांसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

वाजपेयी निधन : बोईसरमध्ये कडकडीत बंद;

 

comments

About Rajtantra

Scroll To Top