दिनांक 18 June 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

वाड्यात सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला

WADA AVAIDH LADUK VAHTUKवाडा/प्रतिनिधी, दि.12 : येथील खंडेश्वरी नाका येथे पहाटेच्या सुमारास सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणारा पिक अप टेम्पो तपासणी नाक्यावर वाहन तपासणी दरम्यान पकडण्यात आला असून या प्रकरणी दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रविवारी पहाटे 3.15 वाजेच्या सुमारास गुजरातमधील वडोदरा येथून सागवान लाकडाच्या साधारण 260 कापलेल्या पट्ट्या जी.जे. 06/ए.एक्स. 4167 या क्रमांकांच्या बोलेरो पिकअपमधून वाडा मार्गे टिटवाळा येथे अवैधरित्या नेल्या जात होत्या. मात्र खंडेश्वरी नाक्यावरील वनपोज तपासणी नाक्यावर कार्यरत असलेले वनरक्षक डि. व्ही. कदम यांनी या गाडीची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. टेम्पो चालकाकडे वनविभागाचा महाराष्ट्रातील परवाना नसल्याने टेम्पोत आढळलेले अंदाजे 35 ते 40 हजार रुपये किंमतीचे सागवान लाकुड व अंदाजे 5 लाख रुपये किंमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला असून टेम्पोचालक भाविन कनोजिया (27) व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनपाल व्ही. जी. मुळमुळे व वनरक्षक कदम याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

मनोरमध्ये खैर तस्करांचा सुळसुळाट

comments

About Rajtantra

Scroll To Top