दिनांक 17 July 2019 वेळ 3:49 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सफाळे येथे दूध व्यवसायातील आव्हान आणि संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न!

सफाळे येथे दूध व्यवसायातील आव्हान आणि संधी या विषयावर कार्यशाळा संपन्न!

SAFALE DUDH KARYASHALAबोईसर/वार्ताहर, दि. 10 : शेतकरी व दुध उत्पादकांनी आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी व स्वतःची मुंबईसह देशभर ओळख निर्माण करण्यासाठी आपण केवळ शेतकरी असल्याची भावना बदलून मोठे व्यापारी असल्याची मानसिकता मनात रुजवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनावरे यांनी आज सफाळे येथे आयोजित दूध व्यवसायातील आव्हान आणि संधी या कार्यशाळेत केले.

यावेळी माजी आमदार मनिषा निमकर, बहुजन विकास आघाडीचे प्रवीण राऊत, अमुल कंपनीचे प्रोजेक्ट प्लानिंग जनरल मॅनेजर अमित व्यास व ऑरगॅनिक मॅनेजर बाळासाहेब खेमनर, रेसिड्यू फ्री ऑरगॅनिक मिशनचे (पुणे) चेअरमन प्रशांत नाईकवाड, निसर्गोपचार तज्ञ डॉ. किशोर बोकील, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ञ उत्तम सहाणे, अमुल दूध डेरीचे व्यवस्थापक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सफाळ्यातील माकुणसार गावातील दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रवीण राऊत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मोमी ( ारेाळ ) या कंपनीच्या लोगोचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुधाचा व्यवसाय करताना शेतकर्‍याला नित्यनेम मेहनत आहे. मात्र घोर मेहनत करून देखील दुध उत्पादक शेतकर्‍याला दुधाचा योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे प्रवीण राऊत यांचा कंपनी स्थापण्याचा निर्णय उत्तम असुन या कंपनीच्या माध्यमातून येथील शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळेल तसेच दुधाबरोबरच अनेक पदार्थ या कंपनीत बनवता येतील व कंपनीच्या नावे त्याचे मार्केटिंग करता येईल, असे डॉ. नारनवरे म्हणाले. बहुजन विकास आघाडीचे प्रवीण राऊत यांनी देखील यावेळी उपस्थित शेकर्‍यांना मार्गदर्शन केले. सफाळा माकुणसार गावात ब्रिटिश काळापासून दुधाचे उत्पादन होत आले आहे. जणू येथील गावांना दैवी शक्ती असल्याने या भागात दूध उत्पादनासाठी एक हजार एकर जागा मिळाली. त्यामुळे येथील दूध निर्मितीची संस्कृती जपण्याचे काम आपण करूया, असे राऊत म्हणाले.

यावेळी तज्ञांनी आधुनिक व सेंद्रिय शेती कशी करावी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

comments

About Rajtantra

Scroll To Top