दिनांक 21 July 2019 वेळ 6:00 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे

VADA NEWSवाडा/प्रतिनिधी, दि. 10 : राज्यभरात सगळीकडेच रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या कायम असताना, वाडा शहरातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे ऐन पावसाळ्यातही न बुजवले गेल्याने अखेर वाडा नगर पंचायतीच्या स्थानिक नगरसेविका व शिवसेना कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलीच चपराक दिली आहे.

वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांवर जागोजागी छोट्या मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणे तर दूर पण चालणेही मुश्किल झाले आहे. महत्त्वाच्या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे बुजवण्याकडे जिल्हा परिषद सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने वाडा नगर पंचायतीच्या नगरसेविका वर्षा गोळे, शिवसेनेचे शहर सचिव मंदार तांदळे यांनी स्वतः पुढाकार घेत प्रभाग क्रमांक 16 मधील मराठी शाळा ते शिवाजी नगर येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम स्वखर्चाने केले.

यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख उमेश पटारे, शहर प्रमुख तथा नगरसेवक प्रकाश केणे, नगरसेवक संदीप गणोरे, उपशहर प्रमुख निलेश पाटील, भरत गायकवाड, प्रथमेश ठाकरे, रोहित सोनावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा आमचे मोबाईल अँप 

comments

About Rajtantra

Scroll To Top