दिनांक 21 July 2019 वेळ 6:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा   वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’   मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण

पालक व शाळा यांचा संवाद होणार सोपा   वाड्यातील तरुणाने विकसीत केले ‘स्मार्टटेक स्कूल अॅप’   मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले अनावरण

 SMARTTAKE APPवाडा, दि. ९:  दैनंदिन जीवनातील धावपळ, नोकरी, व्यवसाय सांभाळून मुलांच्या शाळा, परीक्षा, फी भरणा, शालेय उपक्रमातील सहभाग यासाठी पालकांना मोठी कसरत करावी लागते. मुलांचा गृहपाठ, पालकसभा, परीक्षा वेळापत्रक, अभ्यासक्रम, हजेरी, प्रगती या सगळ्याची माहिती आता पालकांना एका क्लिक वर मिळणार आहे. वाडा तालुक्यातील योगेश पाटील या तरुणाने पालक व शाळा यांच्यातील संवाद सोपा होण्यासाठी स्मार्टटेक स्कूल हे मोबाईल अॅप विकसीत केले आहे. या अॅपचे अनावरण नुकतेचं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते कृष्णकुंज येथे झाले.
योगेश पाटील हे तालुक्यातील गातेस गावचे असून शेतकरी कुटुंबातील पाटील यांनी विकसीत केलेले हे अॅप पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी बहूपयोगी असून या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवता येणार आहे तसेचं विद्यार्थ्यांच्या स्कूल बसची माहितीही या अॅपवर मिळणार असल्याने हे अॅप महत्वपूर्ण असल्याचे सांगून राज ठाकरे यांनी योगेश पाटील यांचे कौतुक केले. या अनावरण प्रसंगी मनसे राज्य उपाध्यक्ष अवधुत चव्हाण, मनसेचे मनोहर धसाडे, सुदर्शन जाधव, प्रदिप वलटे, आनंद गोळे, दिपक गोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top