दिनांक 21 May 2019 वेळ 10:37 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मुरंबे गावातील आपत्तीग्रस्ताना पत्रे वाटप

मुरंबे गावातील आपत्तीग्रस्ताना पत्रे वाटप

IMG-20180808-WA0028वार्ताहर
          बोईसर, दि. ८ : पालघर तालुक्यातील मुरबे येथील समुद्र किनारी राहणाऱ्या ६२ लोकांच्या घरांचे चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. या चक्रीवादळात घराचे पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अश्या ६२ आपत्तीग्रस्ताना लुपिन कंपनीतर्फे ३२५ पत्रे वाटप करण्यात आले .
मागील महिन्यात ३ जुलै रोजी रात्री जोरदार पाऊस व चक्रीवादळ आल्याने समुद्र किनाऱ्यावर यात गावातील ६२ घरांचे छप्पर उडून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तलाठी महेश कचरे यांनी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करून तहसीलदार महेश सागर यांच्याकडे अहवाल पाठवला होता. महेश सागर यांनी बोईसर एमआयडीसीमधील नामांकित असलेल्या लुपिन कंपनीकडे अपघातग्रस्तांना मदतीसाठी आवाहन केले होते. या अहवाल प्रतिसाद देत ल्युपिन कंपनीकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३२५ पत्रे नुकसानभरपाई म्हणून देण्यात आले. लुपींच्या या मदतीबद्दल गावचे सरपंच राकेश तरे यांनी कंपनीच्या बोईसर युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कोठीवले यांचे आभार मानले. यावेळी गावचे सरपंच राकेश तरे यांनी यांनी लुपिन कंपनी बोईसर युनिटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कोठीवले यांचे आभार मानले. यावेळी लुपिन कंपनीचे शाखा व्यवस्थापक भूपेंद्र घरत, निजय पठाण, सरपंच राकेश तरे, उपसरपंच नंदकुमार तरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top