दिनांक 22 September 2019 वेळ 4:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुडूस : गाला कंपनीतील कामगारांचा उपोषणाचा इशारा

कुडूस : गाला कंपनीतील कामगारांचा उपोषणाचा इशारा

कुडूस/प्रतिनिधी, दि. 8 : वाडा तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गाला प्रेसिजन इंजिनिअरींग कंपनीत मागील अनेक वर्षांपासुन हंगामी तत्वावर काम करणार्‍या कामगारांनी नोकरीत कायम करावेे, या मागणीसाठी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

गाला प्रेसिजन इंजिनिअर या कंपनीचे एकनाथ पाटील, भगवान राऊत, नम्रता पाटील व अश्विनी पाटील हे चार कामगार सन 2006 पासून कंपनीत काम करीत आहेत. नियमाप्रमाणे कंपनीत कायम करण्याचंा कालावधी पुर्ण झाला असताना व ही बाब कामगारांनी कंपनी प्रशासनाला लक्षात आणून दिली असताना प्रशासन मात्र या मागणीकडे टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे हतलब झालेल्या या कामगारांनी येत्या 13 ऑगस्टपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे व तसे लेखी निवेदनही कंपनीला देण्यात आले आहे.

चारही कामगारांना कायम करावे, वेळोवेळी देण्यात येणारी पगारवाढ आम्हालाही मिळावी, इतर कामगारांना मिळणार्‍या सोयीसुविधांचा लाभ मिळावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top