दिनांक 18 June 2019 वेळ 6:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नोंदवा आपली प्रतिक्रिया

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणात नोंदवा आपली प्रतिक्रिया

SWATCH SARVEKSHANराजतंत्र मिडीया/पालघर, दि. 7 : केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 या कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छतेविषयी नागरिकांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. या पार्श्‍वभुमीवर नागरिकांना आपले मत नोंदविण्यासाठी केंद्रशासनाने एसएसजी 18 हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छते विषयक प्रतिक्रियांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर जेजुरकर यांनी केले आहे.

संपुर्ण देशात 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2018 दरम्यान स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 हा कार्यक्रम राबविला जात आहे. यात केंद्र शासनाचे अधिकारी गावस्तरावर सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहेत. या सर्वेक्षणामध्ये जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, आठवडी बाजार, तसेच धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांच्या स्वच्छते विषयक व ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. या प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी एसएसजी 18 या नावाचे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून स्वच्छते विषयक विचारलेल्या चार प्रश्‍नांपैकी योग्य उत्तर निवडावे. यानंतर आपल्या प्रतिक्रिया नोंदविण्याच्या प्रक्रियेला तपासून स्वच्छतेविषयक गुणाकंन करण्यात येणार आहे. यासाठी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी तालुका तसेच जिल्हा स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करून या अ‍ॅपवर नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदवून या सर्वेक्षणात जिल्ह्याला जास्तीत जास्त गुण मिळवून सन्मान प्राप्त होईल यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा आमचे मोबाईल अ‍ॅप!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top