दिनांक 21 February 2020 वेळ 12:12 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसील कार्यालयावर मोर्चा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर श्रमजीवी संघटनेचा पालघर तहसील कार्यालयावर मोर्चा

IMG-20180806-WA0020वार्ताहर
            बोईसर, दि. ०६ : वाढती महागाई व वाढते मजुरीचे दर पाहता सामान्य शेतकऱ्याला शेती करणे परवडत नसून त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अश्या गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज पालघर येथे आज मोर्चा काढण्यात आला.
या वर्षी जूनमध्ये तुरळक कोसळलेल्या पावसाने सुमारे महिनाभर दडी मारली. त्यानंतर पाऊसाने जुलै महिन्याच्या मध्यावर पुनरागमन केलेला पाऊस जोरदार कोसळल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. अगोदरच शेतीचा वाढत्या खर्चा व त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेतकरी बेजार झाला असतानाच आता दुबार पेरणीचे संकट शेतकऱयांसमोर उभे ठाकले आहे. रोजगार हमी योजनेतुन शेतीची ईतर कामे केली जातात. मात्र शेतकऱ्यानपुढील संकट पहाता शेतीच्या पेरणी पासून ते मळणी पर्यन्त येणारा मजुरीचा सर्व रोजगार हमीमधून करण्याची मागणी पंडित यांनी सरकार सोबत चर्चा करून केली आहे. या मागणीची तातडीने अंलबजावणी व्हावी म्हणून पालघर येथे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून पालघरचे नायाब तहसीलदार पष्टे यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले .

comments

About Rajtantra

Scroll To Top