दिनांक 21 February 2020 वेळ 1:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जिंदाल बंदराला ग्रामस्थांचा विरोध सीएसआर फंडातून केलेल्या मदतीस नकार

जिंदाल बंदराला ग्रामस्थांचा विरोध सीएसआर फंडातून केलेल्या मदतीस नकार

Boisar Newsवार्ताहर
           बोईसर, दि.०५ : तारापूर एमआयडीसी येथील जिंदाल कंपनीने नांदगावच्या मंडळांना सीएसआर फंडातून भांड्याच्या स्वरूपात भेटवस्तूचे अमिश दाखविण्याचा प्रयन्त केला. परंतु स्थानिक गावकर्‍यांनी दिलेल्या भेट वस्तू जिंदाल गेट च्या समोर इतरत्र टाकून जिंदाल बंदराला विरोध केला.
नांदगाव हे गाव समुद्र किनारी वसले आहे. जिंदाल कंपनीला मालाची देवाण घेवाण समुद्रातून सोपी व्हावी याकरिता जिंदाल बंदर हे २०१२ पासून प्रस्तावित आहे . हे बंदर होण्यासाठी शासनाने जिंदाल बंदर विषयी अनेक मच्छिमार गावांना एकत्र बोलाऊन सुनावणी लावली होती मात्र मच्छिमार बांधवांनी ही सुनावणी होऊ दिली नाही . त्याचप्रमाणे किनारपट्टी च्या भागांमधील ग्रामस्थानी जिंदाल कंपनीकडून कोणत्याही प्रकारची मदत घेण्याचे नाकारले आहे व तरीही जिंदाल कंपनीने तसा प्रयत्न केल्यास त्याठिकाणी आंदोलक जाऊन तो कार्यक्रम उधळून टाकतील अशी समज ग्रामस्थांनी जिन्दाल कंपनीला दिली होती.
तरीही नांदगाव गावामधील मंडळांना भांड्याच्या स्वरूपात मदत देण्याचा प्रयत्न जिंन्दाल कंपनीने केला असता ग्रामस्थांनी ती भांडी घेऊन जिंदाल गेटच्या समोर टाकून दीली व घोषणा देत जिंदाल बंदराला आपला विरोध दर्शविला.

comments

About Rajtantra

Scroll To Top