दिनांक 21 September 2019 वेळ 6:08 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सफाळे एस. टी. आगारातील दिलीप पाटील सेवानिवृत्त

सफाळे एस. टी. आगारातील दिलीप पाटील सेवानिवृत्त

Safale Newsराजतंत्र न्युज नेटवर्क
सफाळे, दि.०५ : राज्य परिवहन महामंडळाच्या सफाळे आगारातील कर्मचारी दिलीप सदानंद पाटील हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. आतापर्यंत दिलेल्या निष्कलंक सेवेबद्दल यांच्या सहकार्‍यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला व सन्मानचिन्ह देऊन निरोप दिला. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभासाठी संजय राऊत (संजूमामा), अनंत पाटील (अण्णा), भरत साखरे, भरत राऊत, प्रभाकर ठाकुर, सुनील पाटील, आगार व्यवस्थापक राजू पाटील, अनंत सोगले आदी उपस्थित होते.
दिलीप पाटील हे सेवेत असतानाच समाजकारणात देखील सक्रीय असून ते शिवसेनेचे एडवण गावचे शाखाप्रमुख आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top