दिनांक 25 August 2019 वेळ 2:01 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोरमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या कार्यशाळेचे उद्घाटन

मनोरमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या कार्यशाळेचे उद्घाटन

GOVER RUBELA LASIKARANराजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषणाच्या प्रमाणात गेल्यावर्षाच्या तुलनेत 38 टक्के घट झाली असून पालघर जिल्ह्यातून कुपोषणाचा नायनाट करण्यासाठी आरोग्य विभाग तत्परतेने कार्य करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकार्‍यांसाठी गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या पार्श्‍वभुमीवर मनोर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य यंत्रनेने लसीकरण करताना प्रत्येक बाळ हे आपलंच बाळ असल्याप्रमाणे हि मोहीम काळजीपूर्वक व यशस्वी रित्या पार पाडावी, असे आवाहनही डॉ. सावंत यांनी यावेळी केले. तर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, गोवरमुळे बालमृत्यू, आंधळेपणा, मेंदूज्वर, कानाचे संक्रमण, फुप्फुसाचे संक्रमण यासारखे मोठे आजार होऊ शकतात व गोवर रुबेला या आजारावर फारसा उपचारही नाही, त्यामुळे लसीकरणामुळे गोवर रुबेलाचे प्रमाण योग्य रित्या कमी करता येऊ शकते. म्हणून सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, लवकरच गोवर-रुबेला लसीचा आंतर्भाव नियमित लसीकरण कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

ही मोहिम 9 महिने ते 15 वर्षाखालील बालकांसाठी संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभागाबरोबरच शिक्षण विभाग, महिला बाल कल्याण विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यवसायिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण पहिल्या टप्प्यात सर्व शाळेतील 15 वर्षा आतील लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात अंगणवाडीतील 9 महिने 6 वर्ष वयोगटातील बालकांना व त्यानंतर शाळा बाह्य लाभार्थ्यांना हे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली आहे. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top