दिनांक 21 October 2019 वेळ 3:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » अनुसूचित जाती-जमाती आयोग पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर

अनुसूचित जाती-जमाती आयोग पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 2 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 7 आणि 8 ऑगस्ट 2018 रोजी पालघर येथे आयोगाचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौर्‍यात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सदस्य (विधी) न्यायमूर्ती सी. एल. थूल तसेच सदस्य (सेवा) मधुकर गायकवाड हे या दौर्‍यात सहभागी असणार आहेत.

7 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता या आयोगाचे पालघर येथे आगमन होणार आहे. यानंतर दुपारी 3 ते 5 या वेळेत जिल्हा परिषद विभागातील अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणार्‍या विविध विकासात्मक योजना तसेच अनुसूचित जाती-जमाती कर्मचारी भरती, बढती, अनुशेष आदींबाबत जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हारचे प्रकल्प अधिकारी यांच्याबरोबर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या कामकाजाचा तसेच जिल्ह्यामध्ये नागरी हक्क संरक्षण, अन्याय-अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा व यात लाभार्थ्यांना देण्यात आलेली आर्थिक मदत याबाबतही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top