दिनांक 22 August 2019 वेळ 3:38 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा : आरोहण संस्थेकडून 17,300 फळझाडांची लागवड

मोखाडा : आरोहण संस्थेकडून 17,300 फळझाडांची लागवड

MOKHADA FALJHADE LAGVADदीपक गायकवाड/मोखाडा, दि. 3 : येथील आरोहण सामाजिक संस्था व सीमेन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाड्यातील बोटोशी येथील भोसपाडा व पेठेपाडा येथे एकूण 17 हजार 300 फळझाडांची लागवड करण्यात आली.

वृक्ष लागवड करून वन संवर्धन होते आणि निसर्गाचे समतोल राहते याच गोष्टीचा आधार घेत आरोहण या संस्थेने सीमेन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांच्या सहकार्याने बोटोशी ग्रामपंचायत हद्दीतील पेठेपाडा व भोसपाडा येथे शेतीकरिता उपयोगात न येणार्‍या जागेत सुमारे 17 हजार 300 वृक्षांची लागवड केली. या फळ झाडांच्या रूपाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासह आदिवासी तसेच दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांना स्वयंरोजगारही उपलब्ध होईल, असा हेतू बाळगून ही वृक्ष लागवड करण्यात आली. या फळझाडांमध्ये विकसित जातीचे आंबे, काजू, पेरू, जांभूळ, आवळा, साग, बांबू आदी वृक्षांचा समावेश आहे.

या आधी याच संस्थेकडून सण 2015 ला एकूण 9 गावांतून 206 शेतकर्‍यांना 19 हजार 451 रोपे वाटप करण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येक शेतकर्‍याला आंबा 20, काजू 25, लिंबू 1, चिकू 2, पेरू 2 व वनसंवर्धनसाठी 40 बांबू अशा प्रकारे रोपे वाटप करून लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन तसेच खते, किटकनाशक, पाणी व्यवस्थापन इत्यादीबाबत शास्त्रीय दृष्टीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे या रोपांचे वृक्षात रुपांतर होऊन जवळपास 34 गावांतील 757 शेतकर्‍यांना आजघडीला रोजगार उपलब्ध झाला आहे.

जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने शेतीची कामे लगबगीने पूर्ण होत असतानाच आदिवासीबहुल समजल्या जाणार्‍या मोखाडा भागात आदिवासी लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी संस्थेतर्फे बर्‍याच उपाय योजना राबविल्या जात आहेत. संस्थेचे कर्मचारी चांगल्या प्रकारे काम करीत असून या भागाचा काहीसा विकास होण्यास सुरुवात झाली आहे, असे मत अनेक लाभार्थी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या फळझाडे लागवडीकरिता येथील गावकरी व लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले आहे. संस्थेच्या अध्यक्ष हेलन जोसेफ, संचालिका अंजली कानिटकर, मानद संचालक नरेश जेना, दीपक भिसे, माधुरी मुकणे, विजय मांडले यांनी वृक्षलागवडीसाठी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या या कार्याबद्दल बोटोशी ग्रामपंचायतीकडून संस्थेचे तोंडभरून कौतुक होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top