दिनांक 20 June 2019 वेळ 5:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमध्ये डेंग्यूचा बळी!

बोईसरमध्ये डेंग्यूचा बळी!

>> 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

प्रतिनिधी/बोईसर, दि. 2 : शहरातील एका 24 वर्षीय तरुणाचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. रमेश तिवार असे सदर तरुणाचे नाव असुन शहरात डेंग्यूचा शिरकाव झाल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, मुळ नेपाळी असणारा रमेश तिवार हा तरुण एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. अचानक आजारी पडलेला रमेश बोईसर येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला सेलवास येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बोईसरमधील अनेक ग्रामपंचायत हद्दीतील कचरा नियमीतपणे उचलत जात नसल्याने येथे कचर्‍याचे ढीग तयार होतात तसेच नालेसफाई व त्यावर औषध फवारणी न झाल्यामुळे डासांचा प्रार्दुभाव होऊन अनेक नवीन आजारांना नागरीकाना समोर जावे लागते.

बोईसर मधील यशवंत श्रुष्टि परिसरातील कचऱ्याचा ढीग

बोईसर मधील यशवंत श्रुष्टि परिसरातील कचऱ्याचा ढीग

बोईसर मधील यशवंत श्रुष्टि परिसरातील कचऱ्याचा ढीगयाबाबत बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याशी संपर्क साधला असता कचरा, साफसफाई, औषध फवारणी नियमित होत असते. परंतु अतिरेक फोफावणारी नवीन बांधकामे व वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामपंचायत यंत्रणा याकामी कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

comments

About Rajtantra

Scroll To Top