दिनांक 22 September 2019 वेळ 5:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वनवासी कल्याण आश्रमातर्फे मोकाशीपाडा येथे वृक्षारोपण

वनवासी कल्याण आश्रमातर्फे मोकाशीपाडा येथे वृक्षारोपण

प्रतिनिधी
जव्हार, दि.३०: तालुक्यातील सारसून मोकाशीपाडा येथे वनवासी कल्याण आश्रम, पालघर आणि जेब्स हेल्थ केअर सोल्यूशन प्रा. लि. कंपनीच्या विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी आंबा, फणस, जांभूळ अशा ८०० प्रकारची फळझाडे लागवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोकाशीपाडा येथील महिलांनी आलेल्या पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले. यानंतर वृक्ष पूजन करून ग्रामस्थांनी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली व झाडे लागवड करण्यात आली. जेब्स हेल्थ केअर सोल्यूशन कंपनीच्या पूजा मेहदंळे व त्यांच्या ३५ सहकार्‍यांसह वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांतचे श्रीधर कोचरेकर व त्यांच्या पत्नी, सारसून ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्राजक्त ओलंबा, रवींद्र ओलंबा, गंगाराम मोकाशी, ईश्वर मोकाशी, महादू मोकाशी, यशवंत मोकाशी, बाळू मोकाशी, देवराम मोकाशी, अंतू खाडम व ग्रामस्थांनी या वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित धोंड व सुनील जाधव यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, उपस्थित सर्व पाहूण्यांसाठी रुचकर गावरान जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

comments

About Rajtantra

Scroll To Top