दिनांक 21 February 2020 वेळ 11:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

P L SHROFF PLASTIC JANJAGRUTIवार्ताहर
बोईसर, दि. ३० : चिंचणी येथील पी. एल. श्रॉफ महाविद्यालयातर्फे प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे बिघडलेल्या वातावरणाला खीळ बसविण्यासाठी तरुण पिढीने प्लास्टिकचा वापर टाळावा तसेच स्वच्छतेच्या सवयी अंगिकाराव्या, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍याचे व्यवस्थापन व पुनर्वापर याबाबत विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची चिंचणी गावामध्ये प्रभातफेरी देखील काढण्यात आली. तसेच गावातील विक्रेत्यांना कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रमिला राऊत, उप प्राचार्य डॉ. मेजर डी. डी. शेलार, बीएमएस विभागाच्या प्राध्यापिका गौरी दातिरे, विनिता शर्मा, अमिता पाटील, अफरोज शेष यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

comments

About Rajtantra

Scroll To Top