दिनांक 21 February 2020 वेळ 11:41 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » चेन्नई मूकबधिर बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पालघरमध्ये मूकबधिरांची रॅली

चेन्नई मूकबधिर बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ पालघरमध्ये मूकबधिरांची रॅली

PALGHAR MUKBADHIR RALLYराजतंत्र न्युज नेटवर्क
            बोईसर, दि. ३० : चेन्नई येथे एका अल्पवयीन मूकबधिर मुलीवर ७ महिने सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने या घटनेचा निषेध म्हणून तसेच या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी पालघरमध्ये शनिवारी मूकबधिर क्रीडा आणि कल्याण मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकरॅली काढण्यात आली. या रॅलीत ३५० मूकबधिर तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. या रॅलीत मुंबईहुन देखील मूकबधिर तरुण हातात काळे झेंडे व निषेध व्यक्त करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून स्थानिक कर्णबधिर मुलांना अडचणीत मदत, संरक्षण व हेल्पलाईन म्हणून वेगळा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top