दिनांक 16 August 2018 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » जिल्हा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
             पालघर, दि. ३० : पालघर जिल्हा निर्मितीला येत्या १ ऑगस्ट रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्धापन दिन तसेच महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार असून सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top