दिनांक 17 February 2020 वेळ 12:46 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

फेक न्यूज : परिणाम आणि दक्षता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
            पालघर, दि. ३० : समाजात फेक न्यूजचे वाढते प्रमाण, त्याचे परिणाम आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता या विषयावर १ ऑगस्ट २०१८ रोजी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आणि जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे.
समाजमाध्यमांद्वारे पसरविल्या जाणार्‍या फेक न्यूज कशा ओळखाव्यात, फेक न्यूजचे समाजावर होणारे परिणाम तसेच त्याविषयी घ्यावयाची दक्षता या विषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. या उद्देशाने आयोजित या कार्यशाळेत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याबरोबरच मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकार, समाजमाध्यमांवर कार्यरत व्यक्ती, व्हॉट्सअ‍ॅपचे अ‍ॅडमीन यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top