दिनांक 22 August 2019 वेळ 2:39 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डोल्हारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा गवळी

डोल्हारा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा गवळी

DOLHARA GRAMPANCHAYATमोखाडा/प्रतिनिधी, दि. 30 : तालुक्यातील डोल्हारा ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक आज, सोमवारी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या उपसरपंचपदाच्या लढतीत सीमा गवळी यांच्या विरोधातील एकमेव सुनील दिवे यांचा अर्ज बाद झाल्याने गवळी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पालघर लोकसभा निवडणूकीच्या पूर्वसंधेला अर्थात 27 मे रोजी डोल्हारा ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली होती. तथापी विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ उद्या संपणार असल्याने आज, 30 जुलै रोजी उपसरपंच पदासाठी निवडणूक संपन्न झाली. यात सीमा गवळी बिनविरोध निवडून आल्या. उद्या, दि. 31 जुलैपासून नविन संचालक मंडळाची कारकिर्द सुरू होणार आहे. दरम्यान, जुलै 2018 मध्ये मागील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार असल्याने लोकनियुक्त सरपंच कैलास उघडे यांच्यासह सर्व संचालक मंडळाला तब्बल दोन महिने केवळ नामधारी म्हणून मिरवावे लागले.
या निवडणूकीत के. एन. कुवरा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी मंडळ अधिकारी डी. डी. जुनगरे, अव्वल कारकुन योगीता चोथे, ग्रामसेवक सचिन अहिरे या अधिकार्‍यांसह नवनिर्वाचित सरपंच कैलास उघडे, मावळत्या सरपंच प्रभावती जाधव व सदस्य रघूनाथ बोढेरे आदी उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top