दिनांक 20 June 2019 वेळ 4:27 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मनोर: खैराची तस्करी करणारा टेम्पो जप्त

मनोर: खैराची तस्करी करणारा टेम्पो जप्त

>> वनविभागाच्या दहिसर वनपरिक्षेत्र कर्मचार्‍यांची धडक कारवाई

MANOR KHAIR TASKARIवाडा/प्रतिनिधी, दि. 29 : वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी नुकताच दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीतून खैराची तस्करी करणार्‍या टेम्पोचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाठलाग करून टेम्पोसह हजारो रुपये किंमतीचे खैर लाकडाचे ओंडके जप्त केले आहेत.

MANOR KHAIR TASKARI1दहिसर वनपरिक्षेत्र हद्दीत साग आणि खैर या जातीच्या मौल्यवान लाकडाची झाडे आढळतात. खैराच्या लाकडाचा उपयोग काथ, रंगकामासाठी तसेच गुटखा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे खैराला टनामागे तीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळतो. त्यामुळे आर्थिक हाव्यासापोटी खैराची अवैध वृक्षतोड वाढली असुन पालघर जिल्ह्यातील अनेक भागातून खैराची तस्करी केली जाते. अशाचप्रकारे दहिसर वनपरिक्षेत्राच्या कर्मचार्‍यांना एम.एच.05/आर. 4643 या क्रमांकाच्या टाटा पिकअप गाडीतून खैराची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या पिकअपचा पाठलाग करून त्यास सकवार गावच्या हद्दीत पकडले. यावेळी टेम्पोची तपासणी केली असता त्यात मौल्यवान खैर लाकडाचे ओंडके आढळून आले. यानंतर वाहन जप्त करून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या अवैध वृक्षतोडीमध्ये स्थानिकांचा सहभाग असल्याचे वनविभागाच्या कर्मचार्‍यांना आढळून आले असुन लवकरच मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल, असे दहीसरचे वनक्षेत्रपाल राजेश सारणीकर यांनी सांगितले.

या करवाईमध्ये वनपाल एम. बी. सोनार, वनरक्षक बी. ए. दळवी, रोहित शिंदे, नाका वनरक्षक ए. बी. सूर्यवंशी यांचा सहभाग होता.

comments

About Rajtantra

Scroll To Top