दिनांक 20 June 2019 वेळ 4:27 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर पोलीस दलाच्या नवीन व अत्याधुनिक संकेतस्थळाचे उद्घाटन

पालघर पोलीस दलाच्या नवीन व अत्याधुनिक संकेतस्थळाचे उद्घाटन

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
              पालघर, दि. २७ : पालघर पोलीस दलाच्या www.palgharpolice.gov.in या नवीन व वैशिष्ट्यपूर्ण संकेतस्थळाचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते नुकतेव करण्यात आले. या संकेतस्थळामुळे नागरिकांची पोलीस दलाशी संबंधीत कामे सुलभ होणार असून पोलिसांचे कामकाजही अतिजलद व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
सदर कार्यक्रमाकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र नवल बजाज, पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अपर पोलीस अधीक्षक वसई राजतिलक रोशन, अपर पोलीस अधीक्षक पालघर योगेश चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.
हे संकेतस्थळ नागरीकांना वापरण्यासाठी अतिशय सोपे व माहितीपूर्ण असून त्याचा जास्तीत जास्त नागरीकांनी वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे..
पालघर पोलीस दलाच्या नवीन संकेतस्थळाची वैशिष्ट्ये
हे संकेतस्थळ मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने सायबर सुरक्षेची खात्री. नागरीकांसाठी वापरण्यास सोपे व माहितीपुर्ण. ऑनलाईन तक्रार आणि गोपनीय माहिती देण्याची सोय. सर्व पोलीस ठाणे, विषेश पथके, उपविभागीय पोलीस अधिकारी यांची इत्यंभूत माहिती आणि सर्व वरीष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही संकेतस्थळावर उपलब्ध. नागरीकांना आता भाडेकरुंची माहिती संबधित पोलीस ठाण्यांना घरबसल्या ऑनलाईन देता येणार. मोबाईल, इतर मौल्यवान वस्तू अथवा महत्वाची व गोपनीय कागदपत्रे हरविल्यास अथवा सापडल्यास नागरीकांना त्याची माहिती संबधित पोलीस ठाण्यांना घर बसल्या ऑनलाईन देता येणार. सदरचे संकेतस्थळ हे अंध व्यक्तींना वापरता यावे या करीता ‘स्क्रीन रिडर’ या विषेश तंत्रज्ञानाचा वापर. सदरचे संकेतस्थळ हे मोबाईल, लॅपटॉप, डेस्क टॉप, अशा सर्व प्रकारच्या उपकरणांवर हाताळण्यास पुरक. सदरचे संकेतस्थळ हे भारतीय शासकीय संकेतस्थळांच्या (जी.आय.जी.डब्ल्यु) निर्देशनानुसार. नागरीकांच्या सुरक्षितता आणि सतर्कतेसाठी विशेष असे ‘सिटिझन अर्लट वॉल’ हे टॅब. सुरक्षा सूचना, पोलिसांची चांगली कामगिरी, माहितीचा अधिकार, महत्वाची संकेतस्थळे व इतर गुन्हे संबधित सर्व माहिती, प्रसार माध्यमांसाठी प्रसिद्धी पत्रक संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top