दिनांक 17 July 2019 वेळ 3:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

बोईसरमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

IMG-20180724-WA0012राजतंत्र न्युज नेटवर्क
            बोईसर, दि. २४ : परळीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठोक मोर्चार्चे आंदोलन सुरु असुन या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बोईसर येथील मराठा समाजाने काल, सोमवारपासुन बोईसर बस डेपो समोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
            गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी वेगवेगळ्या लोकशाही मार्गाने महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात येत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे निघाले तेव्हा कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू दिला नाही, या मोर्चायची नोंद संपूर्ण देशात घेतली गेली. मात्र या ऐतिहासिक मोरचाच्या माध्यमातून कोणत्याही ठोस निर्णयाची शासनाकडून अंमलबजावणी झाली नसल्याने समाजात तीव्र असंतोष उफाळून झाला आहे. शांततेच्या मार्गाने सदनशीरपणे आंदोलन करून हाती काहीच ठोस मॉल्ट नसल्याने शांतीपूर्ण आंदोलनावरचा समाजाचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा असंतोष विकोपाला पोहोचला असुन त्याची परिणीती म्हणून मराठा आरक्षणास प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या संनवकानी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या प्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे ठिय्या आंदोलन पुकारल्याची माहिती बोईसरमधील सकल मराठा समाजातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top