दिनांक 09 December 2019 वेळ 10:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » डहाणूत रंगली वर्षा साहित्य मैफल जल्लोषात आयोजन झाले

डहाणूत रंगली वर्षा साहित्य मैफल जल्लोषात आयोजन झाले

IMG-20180723-WA0255प्रतिनिधी
            डहाणू, दि. २४ : पंढरीच्या वारीचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषडेच्या डहाणू शाखे तर्फे चिखले येथील सुरूच्या नयनरम्य किनाऱ्यावरील गोहेल सी काँस्टेल येथे वर्षा साहित्य मैफलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
           भजन व विठ्ठलाची गाणी गाऊन भक्तिमय अश्या वातावरणात साहित्य मैफिलीची सुरवात करण्यात आली. यावेळी पु.ल.देशपांडे, मंगेश पाडगावकर यासह अनेक लेखकांच्या पुस्तकातील उताऱ्यांचे अभिवाचन करण्यात आले यात डाँ. अंजली मस्करेन्हस, मेघा पाटील, वीणा माच्छि, सुहास राऊत, नीता नहार, रजनी ताजणे, जयश्री ठाकूर, अनुराधा धामोडे, वसंत तांडेल, माधुरी फाटक, प्रीती राऊत, सदानंद संखे, प्रवीण ना.दवणे यांचा सहभाग होता तर पाऊस नभातला, पाऊस मनातला या कार्यक्रमात रमेश तांडेल, प्रेमनाथ राऊत, हेमंत अंधारे, वीणा माच्छी, प्रवीण ना.दवणे, विजय तामोरे यांच्या काव्यरचनेला विशेष दाद मिळाली. नीता नहार यांनी आपल्या कथाकथनाला अभिनयाची जोड दिल्याने सादरीकरण लक्षवेधी ठरले.
           दुसऱ्या सत्रात साहित्यानूभव या कार्यक्रमात आपण साहित्य क्षेत्रात कसे आलो या बाबत उपस्थित साहित्यिकांनी आपला साहित्य प्रवासाबद्दलच्या आठवणी सांगितल्या. विजय चव्हाण यांनी आपल्या जीवन प्रवासात जादुगार झाल्यावर बाबा मंडळी चमत्काराच्या नावावर जादुचे प्रयोग करून, राजकारणी व अंधश्रद्धा जोपासणाऱ्या भोळ्या भक्ताना कसे फसवतात हे पटवून दिले तर रमेश तांडेल यांनी माऊथ आॅर्गन वाजवून आपल्या अदाकारीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात जेष्ठकवी जनार्दन पाटील, सुमाल्य त्रेमासिकाचे संपादक जगन्नाथ घरत व कवी संतोष मेर यांची विशेष उपस्थिती होती. समुद्र किनारी निसर्गरम्य अशा वातावरणातील मैफीलीची सांगता आनंदात व उत्साहात झाली.

comments

About Rajtantra

Scroll To Top