दिनांक 17 July 2019 वेळ 4:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूच्या समुद्र किनारी शेकडो किलो प्लास्टिकचा कचरा

डहाणूच्या समुद्र किनारी शेकडो किलो प्लास्टिकचा कचरा

छायाचित्र : सुशिल बागुल

छायाचित्र : सुशिल बागुल

राजतंत्र मीडिया /दि. 22 : काही दिवसांपुर्वीच राज्य शासनातर्फे प्लास्टिक व थर्माकॉलवर बंदी घालण्यात आली. या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला तर अनेकांनी नाराजी दर्शवली. मात्र मागील काही दिवसांत समुद्राला आलेल्या उधाणातून समुद्राच्या पोटात जमा झालेला लाखो टन कचरा राज्याच्या विविध समुद्र किनार्‍यावर फेकला गेला असुन यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा समावेश आहे. डहाणू समुद्र किनार्‍यावरही हीच परिस्थिती असुन 19 जुलै रोजी पारनाका समुद्र किनारी टिपलेल्या वरील छायाचित्रातून याची प्रचिती येईल. यावेळी नजर जाईल तिथपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दिसुन येत असल्याने प्लास्टिक बंदीच्या आवश्यकतेची एक झलक दिसुन आली. दरम्यान, समुद्र किनारा बकाळ करणारा हा कचरा साफ करताना सफाई कर्मचार्‍यांच्या मात्र नाकी नऊ आले.

comments

About Rajtantra

Scroll To Top