दिनांक 21 February 2020 वेळ 12:11 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » जव्हार : मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद

जव्हार : मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद

>> शेकडो विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान, >>अभ्यास केंद्र सुरु करण्याची जव्हारकरांची मागणी

JAWHAR MUKT VIDYAPITHमनोज कामडी/जव्हार, दि. 22 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जव्हार महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र अचानक बंद केल्याने या केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तालुक्यात केवळ एकच कनिष्ठ महाविद्यालय असल्याने येथील विद्यार्थ्यांना आता तलासरी किंवा पालघर केंद्रात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जव्हार येथील अभ्यास केंद्र नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीशी संलग्न आहे. सन 1992 ला या केंद्राची स्थापना होऊन यावर्षी केंद्राला 26 वर्ष पुर्ण झाली होती. हे केंद्र स्थापन झाल्यापासुन जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा अशा आदिवासी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थ्यांनी नोकरी, धंदा, व्यवसाय करून येथून आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात कला शाखेच्या पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी मिळुन एकूण 1250 विद्यार्थ्यी या केंद्रातून शिक्षण घेत होते. मात्र 26 वर्षांपासून सुरळीत सुरु असलेले हे केंद्र आता अचानक बंद करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आपले पुढील शिक्षण आता कसे पुर्ण होणार असा प्रश्‍न या विद्यार्थ्यांना पडला आहे. तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा देखील हिरमोड झाला आहे. मुक्त विद्यापीठ केंद्राच्या काही अंतर्गत अडचणीमुळे अभ्यास केंद्र बंद केल्याचे सांगण्यात येत असले तरीही कोणतेही ठोस कारण संबंधितांकडून देण्यात आलेले नाही.

दरम्यान, जव्हारचे मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र नियमित सुरु करावे अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा येथील विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top