पालघर पोलीसांची अवैध दारु धंद्यांवर कारवाई

0
11

97 हजाराची दारु जप्त, 25 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

DARU Mainराजतंत्र मीडिया/दि. 26 : पालघर जिल्हा पोलीसांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध दारु धंद्यांवर कारवाई करत एकुण 96 हजार 805 रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अर्नाळा, जव्हार, कासा, केळवा, बोईसर, पालघर, मनोर, सफाळा, तारापुर, सातपाटी, विक्रमगड, वालीव, घोलवड, तलासरी, तुळींज, वाणगांव आदी भागात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या अवैध दारु धंद्यात वापरली गेलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीची वाहने देखील पोलीसांनी जप्त केली आहेत.DARU1

अंमली पदार्थांचे सेवन,
नालासोपार्‍यात तिघांना अटक

नालासोपारा पश्‍चिमेतील समेळपाडा भागात अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या तिन जणांना नालासोपारा पोलीसांनी अटक केली असुन त्यांच्याविरोधात एन.डी.पी.एस अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8 (क) सह कलम 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारमध्ये 6 हजारांचा गांजा जप्त

गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशीररित्या विक्री करणार्‍या विरार येथील एका घरावर धाड टाकत पोलीसांनी येथुन 6 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी एका महिलेविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments