दिनांक 17 February 2020 वेळ 12:35 PM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » तिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला

तिळसे येथील नदीत तरूण बुडाला, दोन दिवसानंतर मृतदेह सापडला

IMG-20180719-WA0101प्रतिनिधी
            वाडा, दि. १९ : तालुक्यातील तिळसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या डागडुजीच्या कामासाठी आलेला श्रवण चौहान (२०) हा तरुण कामगार हातपाय धुण्यासाठी नदीवर गेला असता पाय घसरून नदी प्रवाहात पडून बुडाल्याची घटना बुधवारी ( दि. १८) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला घडली असून वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवान व येथील ग्रामस्थानच्या साहाय्याने दोन दिवसानंतर श्रवणचा मृतदेह हाती लागला आहे.
           श्रवण हा तरूण मुळचा उत्तर प्रदेश मधील रहाणारा असून तिळसे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या लादीचे काम करण्यासाठी आला असता बुधवारी काम आटोपून तो हातपाय धुण्यासाठी मंदिराच्या लगत असलेल्या नदीवर गेला होता. यावेळी पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहात पडला. पाण्याच्या प्रवाहाचा वेग भरपूर असल्याने तो प्रवाहात वाहून गेला. घटनेच्या २ दिवसानंतर आज, शुक्रवारी वसई- विरारच्या अग्निशमन दल व ग्रामस्थानच्या मदतीने श्रवणचा मृतदेह हाती लागला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top