दिनांक 21 February 2020 वेळ 1:25 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमधील विविध समस्याविरोधात शिवसेनेचे भिकमागो आंदोलन

बोईसरमधील विविध समस्याविरोधात शिवसेनेचे भिकमागो आंदोलन

IMG20180720114308 (1)वार्ताहर
          बोईसर , दि. २० : येथील रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच इतर नागरी समस्यांविरोधात आज शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत भिख मागो आंदोलन केले. यावेळी सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बोईसर- चित्रालाय रस्त्यावरील सिडको भागात २ तास रास्ता रोको केला. परिसरातील महिला व आबालवृद्द भरपावसात या आंदोलनात सहभागी झाले होते.
         बोईसर शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर भागातील तास्त्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून अनेक अपघात घडत आहेत. तर वाहनचालकांसह नागरिकांना या रस्त्यावर प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. बोईसर ते चित्रालय रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तसेच बोईसराला राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार्या चिल्हार रस्त्याचे मंद गतीने सुरु असलेले काम, दोन जणांचा बळी घेणारा दांडीपाडा व लोखंडापाड्याला जोडणारा पुल, शहरात वाढत असलेले अतिक्रमण आदी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच ग्रामीण रुग्णालय व इतर मागण्यांसाठी शिवसेनेने आज भर पावसात हे भीक मागो मागो आंदोलन केले. यावेळी महिलांनी व कार्यकर्त्यांनी सिडको येथे रस्त्यावर ठाण मांडून २ तास रस्ता रोको केला. लोखंडापाड्यातील ग्रामस्थानीही या आंदोलनामध्ये सामील होऊन प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा केली व आपला राग व्यक्त केला. तसेच या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली.
           बोईसर स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता बोईसर – ओस्तवाल ते सिडको बायपास रस्ता बनवणे, बोईसर-चिल्हार रस्ता व त्यावरील सूर्या नदीवरील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, वंजारवाडा ते शेगाव रस्ता, काटकरपाडा गणेशनगर ते राणीशिगाव रस्ता व बेटेगाव ते माकडचोला आदी रस्तानची कामे लवकरात लवकर सुरु करावी अशा अनेक मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. यावेळी रस्तावरील खड्ड्यात पडून जखमी व मृत्यू झालेल्या अपघात ग्रस्ताचे दाखले देऊन सेनेचे तालुका प्रमुख नीलम संखे यांनी संबंधित अधिकाऱ्याना येथील परिस्थिती निदर्शनात आणून दिली.
यावेळी यावेळी बोईसर ग्रामपंचयतिचे ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषदेच्या अधिकार्यानीआंदोलनकर्त्याची भेट घेत त्यांच्याशी चारचा केली. लोखंडपाडा पूल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर झाला असून लवकरात लवकर त्याचे काम सुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदिकार्यानी यावेळी दिले. तसेच तसेच बोईसर चैत्राली या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार असल्याचे अधिकारी सुभाष केणी यांनी सांगितले. तर बोईसर चिल्हार रस्त्यावरील बेटेगाव व टाटा हाऊसिंगजवळ पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा नाही त्यामुळे तिथे पाणी साठवून रस्ता उखडला जातो. परंतु त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन तारापूर एमआयडीसीचे बांधकाम अधिकारी भागात यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
            शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, उप जिल्हा प्रमुख राजेश कुंटे, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, तालुका प्रमुख सुधीर तामोरे, नीलम संखे, शहर प्रमुख मुकेश पाटील, पालघर सभापती मनीषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, वैभव संखे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, सुभाष म्हात्रे, गिरीश राऊत, कल्पेश पिंपळे आदींसह सेनेचे इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते, . 

comments

About Rajtantra

Scroll To Top