दिनांक 21 February 2020 वेळ 10:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे.

जव्हार शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे.

IMG20180720151121प्रतिनिधी
            जव्हार, दि. २० : नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांवर ठिक-ठिकाणी मोठ मोठाले खड्डेच खड्डे पडले असून, जव्हार शहरातील रस्त्यांवर खड्डे कि खड्यात जव्हार अशी दैनिय स्थिती झाली आहे. पावसाळा सुरु झाला कि जव्हार शहरातील रस्त्यांची दरवर्षी हीच परिस्थितीअसते व त्याविरोधात . आवाज उठविल्यानंतरच कशीबशी डागडुगी करून खड्डे बुजविले जातात. मात्र दरवर्षी परिस्थिती जैसे थे होते.
            जव्हार शहरातील नगरपरिषद हद्दीतील रस्ते, यामध्ये यशवंत नगर मोर्चा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाचबत्ती नाका, अर्बन बँक, आदी भागांतील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठे मोठे खड्डे पडले असून संपूर्ण जव्हार शहराच खड्डेमय झाल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या मोठ्या खड्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. तर या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांचे हाल होत आहेत. हे खड्डे बुजवायला नगरपरिषदेला वेळ नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
          जव्हार शहर हे तालुक्यातील दीड लाख लोकांसाठी एकमेव असलेली बाजारपेठ असून, नागरिकांना बाजार अन्य कार्यालयीन कामासाठी जव्हार शिवाय पर्याय नाही. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी जव्हार हेच ठिकाण गाठावे लागते. शहरात रोज विविध ठिकाणाहून येणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच वाहनांची नेहमीच वर्दळ असते. मात्र शहरात एवढे खड्डे पडलेत कि खड्डे मोजायला घेतले तरीही पडलेल्या खड्यांची गणती होणार नाही. अशी खड्डेमय स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झाला आहे. जव्हार शहरातील स्थानिकांनी पडलेल्या खड्यांबाबत नगरपरिषदेकडे कित्येक वेळा विचारपुस करूनही याकडे लक्ष दिल जात नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top