दिनांक 22 September 2019 वेळ 4:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात मनसेचे अनोखे आंदोलन खड्यांना दिली लोकप्रतिनिधीची नावे 

वाड्यात मनसेचे अनोखे आंदोलन खड्यांना दिली लोकप्रतिनिधीची नावे 

IMG-20180720-WA0061प्रतिनिधी
             वाडा, दि. २०: तालुक्यातील बहुतांशी रस्ते  खड्ड्यात गेले असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र प्रशासन तसेच तालुक्यातील मंत्री, आमदार,खासदार याची दखल घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांवरील खड्यांना मंत्री, खासदार व आमदार यांची नावे देण्याचे अनोखे आंदोलन आज  वाडा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून छेडण्यात आले.
            भिवंडी – वाडा- मनोर या मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यामुळे हा रस्ता आहे कि खड्डा हे कळणे मुश्किल झाले आहे. काही रस्ते तर मे महिन्यात बनविण्यात आले असून जून महिन्यात त्याची दुर्दशा झाल्याची अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. बांधकाम प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मुख्य रस्ता असतानाही ह्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गुढघाभर खड्डे पडले आहेत.
या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे लक्ष वेधण्यासाठी आज मनसेकडून  आंदोलन छेडण्यात आले. या नामकरण आंदोलनामधे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सवरा, खासदार कपिल पाटिल, आमदार शांताराम मोरे यांची नावे खड्डेमय  रस्त्यांना देण्यात येऊन प्रशासनाचे आणि आमदार खासदार आणि मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचे काम मनसे कडून करण्यात आले. 
            या आंदोलनामधे वाडा तालुका अध्यक्ष कांतीकुमार ठाकरे ,सचिव- देवेंद्र भानुशाली,निखिल बागुल वाडा शहर अध्यक्ष जितेश किणी, सुभास गावीत, विश्वास पाटिल, दिलीप सांबरे, रविंद जाधव, सुभाष पाटिल, संदीप महाकाल, गणेश गवारी, विक्रांत पाटिल, नितिन भोईर, हेमंत जाधव, दिवेश पाटिल, प्रथमेश पाटिल, स्वप्निल मोरे, प्रितम पाटिल यांच्यासह अनेक मनसे सैनिकांनी सहभाग घेतला होता.
            मनसेने केलेल्या आंदोलनानंतर तरी झोपलेल्या शासन व प्रशासनाला जाग येऊन वाडा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था सुधारेल अशी अपेक्षा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
          दरम्यान वाडा शहरातील रस्त्यावरील खड्डे हे वेळोवेळी भरले जातील, तसेच पावसाळयांनंतर हे खड्डे डांबराने भरले जातील. किनईपाडा येथील  सुनालको कंपनीजवळ चालु पावसाळ्यात पाणीसाठा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. कुडुस व कांचाड फाटा येथील खड्डे भरून रस्ता सुस्थितीत ठेवण्याबाबत काळजी घेतली जाईल असे लेखी आश्वासन  बांधकाम विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
      

comments

About Rajtantra

Scroll To Top