दिनांक 19 June 2019 वेळ 3:37 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » माजी सैनिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

माजी सैनिकांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
            पालघर, दि. १९ : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा आणि युद्ध विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली आज, गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यानी माजी सानिकाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्यां सोडविण्याबाबत आश्वासन दिले. यावेळी ११ कुटुंबांनी आपल्या समस्यांबाबतचे अर्ज दाखल केले.
            पालघर जिल्ह्यात माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्यां सोडविण्यासाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आज प्राप्त झालेल्या अर्जावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यानी संबंधितांना दिले आहेत. या अर्जावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी २० दिवसानंतर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीस माजी सानिकाच्या कुटुंबियांनाही बोलावण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार श्रीम. उज्वला भगत यानी दिली.

comments

About Rajtantra

Scroll To Top