दिनांक 16 August 2018 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कासा : १० लाखांचा गुटखा पकडला

कासा : १० लाखांचा गुटखा पकडला

IMG-20180719-WA0010राजतंत्र न्युज नेटवर्क
            दि. १९ : गुजरात राज्यातून चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी आणला जात असलेल्या १० लाख रुपयांचा गुटखा पकडण्यात डहाणू तालुक्यातील कास पोलिसांना यश आले आहे. एका ट्रकमध्ये भरून हा गुटखा राज्यात बेकायदा विक्रीसाठी आणला जात होता.
          १६ जुलै रोजी पोलिसांनी मुंबई – अहमदाबाद महामार्गावरून एम. एच. १०/ झेड १६३१ या क्रमांकाच्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर राज्यात गुटखा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कासा पोलीस स्टेशनच्या पथकाने चारोटी तोल नाका येथे सापळा रचला असता मध्यरात्री ३.३० च्या सुमारास संशयीत ट्रक पोलिसांना आढळून आला. यावेळी ट्रक अडवून चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ट्रकची फणी केली असता ट्रकमध्ये विमल पण मसाला, चेतना तंबाखु व इतर तंबाखूजन्य अन्नपदार्थांचा सुमारे ९ लाख ९८ हजार रुपये किमतीचा माल आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत ट्रकचालकाला अटक केली असून कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत 
             IMG-20180719-WA0011दरम्यान, पालघर पोलिसांकडून काल, १८ जुलै रोजी डहाणू, जव्हार व मनोर पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यात आली असून एकूण १९ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी ३ जणांविरोधात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र प्रोबिव्हिजन अक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे. 

comments

About Rajtantra

Scroll To Top