दिनांक 21 September 2019 वेळ 6:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » घरफोडी करणारी टोळी गजाआड १० गुन्ह्याची उकल, १ लाखांचा ऐवज हस्तगत

घरफोडी करणारी टोळी गजाआड १० गुन्ह्याची उकल, १ लाखांचा ऐवज हस्तगत

IMG-20180719-WA0012 (1)राजतंत्र न्युज नेटवर्क
             दि. १९ : जिल्ह्यातील बोईसर, पालघर व डहाणू शहरात रात्रीच्या सुमारास घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला गंजाआड करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून यात एक सराईत चोरट्याचा समावेश आहे. या टोळीकडून एकूण १० गुन्ह्याची उकल करण्यात अली असुन एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
            बोईसर, पालघर व डहाणू शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घरफोडीच्या घटनांच्या पार्शवभूमीवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून या घटनांच्या तपासासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने बोईसर पोळी स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका चोरीच्या घटनेचा तपास करत या चौघांना अटक केली. त्यांच्या पोलीस कोठडी दरम्यान आपण बोईसर, पालघर, डहाणू, घोलवड. व सातपाटी भागातील १० घरात चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. या टोळीने विविध घरफोड्यांमधून चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने, टी.व्ही, संच व रोख रक्कम असा एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, यातील मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याने यापूर्वी चोरीच्या दोन प्रकरणामध्ये प्रत्येकी ४-४ अशी एकूण ८ महिन्यांची शिक्षा भोगली आहे. हा आरोपी जेलमधून शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा साथीदारांसह घरफोडी चोरीचे गुन्हे करीत असे. तसेच त्याच्यावर यापूर्वीचे अन्य दोन गुन्हे न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top