दिनांक 21 September 2019 वेळ 5:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कुडूस ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी डाॅ गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड. 

कुडूस ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी डाॅ गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड. 

IMG-20180719-WA0012प्रतिनिधी
          कुडूस, दि. १९ : वाडा तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी डाॅ. गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर प्रथम उप सरपंच म्हणून अंजुमन सुसे यांची निवड करण्यात आली होती. तर त्याच वेळी दोन वर्षाच्या कालावधीनंतर हे पद डाॅ. गिरीश चौधरी यांना द्यावे असे ठरल्याने, सुसे यांनी स्वखुशीने या पदाचा राजीनामा दिला व डाॅ. गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
           या निमित्त ग्रामपंचायतीच्या सभागृहात विद्यमान उपसरपंच गिरीश चौधरी यांच्या स्वागत व सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातुन प्रारंभी ग्रामविकास अधिकारी अनिरूध्द पाटील यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गतीने कामे करून गावचा सर्वतोपरी विकास करावा असे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते व जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी डाॅ. गिरीश चौधरी यांना शुभेच्छा देवून ग्रामपंचायतीच्या कामासाठी जी मदत लागेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालघर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी ह्या होत्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, येथील स्मशान भूमी, पाणी योजना, व डंपींग ग्राऊंड ही महत्वाची कामे आहेत. त्यांचा पाठपुरावा जिल्हा स्थरावरून करून ती पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीला मदत करणार असल्याचे सांगियले. तलावाचे खोलीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद फंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासनहि त्यांनी यावेळी दिले. 
           सत्कार मूर्ती उपसरपंच डाॅ. गिरीश चौधरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणा-या विकास कामांची  जोमाने सुरूवात करण्याचे आश्वासन दिले. रस्ते, दलीत व आदिवासी वस्तीतील कामे, गावातील रस्ते, पाणीयोजना ,स्वच्छता या बाबत अग्रक्रमाने कामे हाती घेण्यात येतील असे त्यांनी सांगितले. 
          या कार्यक्रमासाठी वाडा पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ पाटील, नरेश आकरे, माजी सरपंच व जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग चौधरी,मुस्तफा मेमन ,नितीन जाधव ,सरपंच छबीताई तुंबडे, माजी उपसरपंच अंजुमन सुसे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

comments

About Rajtantra

Scroll To Top