दिनांक 17 February 2020 वेळ 12:05 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाड्यात शाळेची ईमारत कोसळली ४७ विद्यार्थी बचावले शिक्षण विभागाची अनास्था, जि.पचा भोंगळ कारभार

मोखाड्यात शाळेची ईमारत कोसळली ४७ विद्यार्थी बचावले शिक्षण विभागाची अनास्था, जि.पचा भोंगळ कारभार

IMG-20180718-WA0009प्रतिनिधी
            मोखाडा. दि. १९ : तालुक्यातील शेलमपाडा जिल्हापरिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या मंगळवारी मुसळधार पावसामूळे कोसळल्या आहेत.सुदैवाने रात्री उशिरा हि घटना घडल्याने ४७ विद्यार्थी बचावले आहेत. सद्यस्थितीत एका समाजमंदिरात विद्यार्थ्यांची तात्पूर्ती शिक्षणाची व्यवस्था करण्यांत आलेली आहे.या घटनेमुळे .जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
             तालुक्यातील ३८ शाळा धोकादायक आहेत. मात्र असे असतांनाही या शाळा आजही दुरूस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. मागील आर्थिक वर्षात शाळा दुरूस्तीवर एकट्या मोखाडा तालुक्यात १ कोटी ३२ लाख ८८ हजार ६६८ रूपये ईतका निधी खर्च होवूनही मोखाड्यातील कमकुवत शाळा अतिवृष्टीत मोडून पडत आहेत एवढी भयानक परिस्थिती आहे.
            शेलमपाडा शाळेच्या दुरूस्तीबाबत सन २०१५ सालापासून पत्रव्यहार करून पाठपुरावा करण्यांत येत असल्याचे केंद्रप्रमूख घनःशाम कांबळे यांनी सांगीतले आहे. असे असतांनाही ही शाळा दुरूस्तीपासून वंचित राहिली व अखेर मंगळवारी कोसळली.
जिल्हापरिषदेचे वरातीमागून घोडे
           याबाबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांच्याशी संपर्क साधला असता मागील वर्षी २८ शाळा मंजूर होत्या पैकी १७ शाळा दुरूस्त तर ७ शाळा प्रगतीपथावर असून चालू वर्षी २८ शाळा दुरूस्तीसाठी प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. अतिधोकादायक शाळांबाबत त्यांना छेडले असता धोकादायक शाळा पाडण्याबाबत उशिराने प्रस्ताव आला असल्याची माहिती विशे यांनी दिली आहे.
जि.प. उपाध्यक्षांचे चौकशीचे आदेश
          मोखाडा तालुक्यातील शाळा दुरूस्ती साठी १ कोटी ३२ लाख ८८६६८ ईतका ईतका क्षेत्रफळापेक्षाही जास्त निधी देवूनही अत्यावश्यक दुरूस्तीबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश देणार असल्याची माहिती जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी दिली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top