दिनांक 21 September 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » ग्रामपंचायत शेल्टे व टर्नकी कंपनीतर्फे वृक्षारोपण

ग्रामपंचायत शेल्टे व टर्नकी कंपनीतर्फे वृक्षारोपण

IMG-20180719-WA0038राजतंत्र न्युज नेटवर्क
              वाडा, दि. १९: तालुक्यातील ग्रामपंचायत शेल्टे व ए.एन.जे टर्नकी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेल्टे ग्रामपंचायत हद्दीमध्ये व कंपनीच्या आवारात ग्रामस्थांच्या श्रमदानाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत ७०० झाडे व कंपनीकडून १००० झाडे उपलब्ध करून देण्यात आली.
              शेल्टे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ए.एन.जे.टर्नकी प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या प्लायवूड तयार करणाऱ्या अत्याधुनिक कंपनीचे काम सुरु आहे, या कंपनीमार्फत शेल्टे ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीवर २ लाख ५० हजार खर्च करून सभामंडप बांधून देण्यात आला आहे, त्या सभामंडपाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून गावात तसेच कंपनीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कंपनीला ग्रामस्थांकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे या ग्रामपंचायतीचे सरपंच राजू गायकर व ग्रामपंचायतीच्या सर्व सद्स्यानी सांगितले. तसेच गावातील प्रत्येक हाताला कंपनीत काम देण्याचे आश्वासन यावेळी कंपनीकडून देण्यात आले.
             या वृक्षारोपण कार्यक्रमास कंपनीचे डायरेक्टर मघाराम कुलारीया, इंजिनिअर उद्धव आंबेकर, सुरेश भाई, देवा ग्रुपचे सचिन ठाकरे,राहुल पाटील,मा.उपसरपंच संदेश पाटील, पोलिस पाटील गजानन पाटील, दिनकर जाधव,जेष्ठ नागरिक शेवंती जाधव,ग्रामपंचायत सदस्य आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top