दिनांक 25 August 2019 वेळ 2:26 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » अपघातानंतर बांधकाम विभागाने आली जाग भिवंडी-वाडा रस्त्याचे डागडुजीचे काम अखेर सुरु

अपघातानंतर बांधकाम विभागाने आली जाग भिवंडी-वाडा रस्त्याचे डागडुजीचे काम अखेर सुरु

WADA BHIVANDI MARGप्रतिनिधी
              वाडा दि.१८ : भिवंडी-वाडा महामार्गावर असंख्य खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. तालुक्यातील खुपरी जवळील सनाल्को कंपनीजवळ मोठा खड्डा पडल्याने तेथे प्रचंड पाणीसाठा असून हा वळणाचा रस्ता असल्याने गेल्या महिनाभरात असंख्य अपघात झाले. यात काही निरपराध अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला, तर काही अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. अखेर अनेक अपघात घडल्यानंतर बांधकाम विभागाच्या ढिम्म प्रशासनाला आता जाग आली असून रस्त्याच्या थातूरमातूर डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.
             सनाल्को कंपनीजवळील हा वळणाचा व निसरडा रस्ता दरवर्षी फुटत असतो. उन्हाळ्यातही या रस्त्यावर कायम खड्डे असतात. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग व या रस्त्याचा ठेका असलेली सप्रीम कंपनी उदासीनता दाखवत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने सर्वसामान्य जनता लावून धरत असतानाही बांधकाम विभाग प्रशासन व कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असते. या ठिकाणी प्रचंड मोठे खड्डे तयार झाल्याने अनेक दुचाकीचालक व अन्य वाहनांचे मोठ्या प्रमाणावर अपघात घडले. या अपघातात अनेक जणांना नाहक जीव गमवावा लागला तर अनेक जण दुखापतग्रस्त आहेत.
             या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रोजचा अपघात होऊ लागल्याने नागरिकात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणावर पडलेल्या पावसात या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने सलग दोन – दोन दिवस वाडा-भिवंडी महामार्गावरची वाहतूक बंद झाल्याने प्रवासी जनतेची मोठी कोंडी झाली होती. त्यामुळे वारंवार बांधकाम विभागाच्या प्रशासनाला जाब विचारल्यानंतर अखेर बुधवारी (दि. 18 ) या रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अरविंद कापडणीस यांच्याशी संपर्क केला असता पावसाने थोडी उसंत घेतल्याने रस्त्याच्या डागडुजीचे काम तातडीने हाती घेतल्याचे त्यांन

comments

About Rajtantra

Scroll To Top