दिनांक 17 February 2020 वेळ 12:29 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ऐनशेत गावाला समृद्ध ग्राम पुरस्कार

ऐनशेत गावाला समृद्ध ग्राम पुरस्कार

ENSHET SAMRUDDH GRAMप्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या ऐनशेत गावाला समृद्ध कोकण संस्थेच्या वतीने समृद्ध ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले.

समृद्ध कोकण संस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. 16) मुंबईतील दादर येथील वीर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणातील पाच जिल्ह्यांतील विविध गावांमध्ये कृषी, पर्यटन तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गावांचा गौरव करण्यात आला.

पालघर जिल्ह्यातून, शेतीमध्ये बागायती शेती, फुलशेती, लोकसहभागातून विविध सार्वजनिक वास्तूंची उभारणी, 66 वर्षांची एक गाव एक गणपती परंपरा, विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, विविध शासकीय योजनांचा लाभ व त्या माध्यमातून गावाला मिळालेले तालुका व जिल्हास्तरावरील विविध पुरस्कार यांची दखल घेऊन ऐनशेत गावाची समृद्ध ग्राम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे निवृत्त प्रधान सचिव द. मु. सुकथनकर, कोकण पर्यटन व उद्योग मंडळाचे अध्यक्ष माधव भंडारी, कर्नाटकचे स्वामी मृत्युंजय, आयआयटी तज्ञ अशोक सराफ, कृषी व पर्यटन क्षेत्रातील नामवंत मान्यवर जयेंद्र साळगावकर, दिपक परब, राजेंद्र सावंत, भानू देसाई, दिपक सकपाळ, समृद्ध कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, कार्याध्यक्ष किशोरभाई धारिया यांबरोबर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

>> समृद्ध कोकणच्या वाडा तालुकाध्यक्षपदी युवराज ठाकरे
समृद्ध कोकण संस्थेच्या 16 व्या वर्धापनदिनी कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांच्या नेमणूका करण्यात आल्या. त्यापैकी पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी रोहित पाटील यांची तर वाडा तालुकाध्यक्षपदी ज्ञानार्जन साप्ताहिकाचे संपादक व सामाजिक कार्यकर्ते युवराज ठाकरे यांची निवड करण्यात आली.

comments

About Rajtantra

Scroll To Top