दिनांक 21 September 2019 वेळ 6:44 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : माजी उप जिल्हाधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

वाडा : माजी उप जिल्हाधिकार्‍यांच्या घरावर दरोडा

>> पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला

WADA DARODAदिनेश यादव/वाडा, दि. 17 : तालुक्यातील वडवली येथे राहणारे व महसूल विभागाच्या उप जिल्हाधिकारी पदावरून निवृत्त झालेले नामदेव जाधव यांच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पहाटे 3.25 वाजताच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोरांनी माजी उप जिल्हाधिकारी जाधव यांच्या घराच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीतून प्रवेश करत घरात झोपलेले त्यांचे भाऊ प्रकाश, आई व अन्य नातेवाईकांना पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांनी जाधव यांच्या आईकडे कपाटांच्या चाव्यांची मागणी करून घरातील पाचही कपाटातील 3 गंठण, 5 अंगठ्या, 1 धनेमाळ, चैन, मंगळसूत्र असे सुमारे 20 तोळे सोन्याचे दागिने व 25 हजारांची रोकड असा सुमारे 4 लाख 40 हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला आहे.

वडवली गावातील भर वस्तीत असलेल्या घरात राजरोसपणे हा दरोडा पडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 395 व आर्म अक्ट 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक सुदाम शिंदे अधिक तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top