दिनांक 30 May 2020 वेळ 8:03 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा! बोईसरमधील वसुंधरा कंपनीला राजू शेट्टींचा इशारा

दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा! बोईसरमधील वसुंधरा कंपनीला राजू शेट्टींचा इशारा

DUDH AANDOLAN BOISARवार्ताहर
           बोईसर, दि. १६ : गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ देऊन हे अनुदान उत्पादकाच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी मध्यरात्रीपासूनच दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभुमीवर गुजरातमधुन दुधाची आयात करणार्‍या बोईसर एमआयडीसीमधील दुध व दुधाचे पदार्थ बनविणार्‍या वसुंधरा कंपनीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दूध उत्पादकांचे आंदोलन संपेपर्यंत गुजरातमधुन दुधाची आयात थांबवा, अशी विनंती कंपनी प्रशासनाला केली. अन्यथा दुधाचे टँकर आडवे करु, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी पदवीधर शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील, भूमी सेनेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, माजी आमदार मनीषा निमकर आदी उपस्थित होते. इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पाच हजार पेक्षा जास्त दुध उत्पादक शेतकरी या आंदोलनात उतरले असुन दुध आंदोलनाला पहिल्या दिवशीच 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा शेट्टी यांनी यावेळी केला.

comments

About Rajtantra

Scroll To Top