दिनांक 25 May 2020 वेळ 1:59 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » तारापुर येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चातर्फे जागरूकता कार्यक्रम संपन्न

तारापुर येथे भाजपा अल्पसंख्यांक मोर्चातर्फे जागरूकता कार्यक्रम संपन्न

BHAJAP ALPSANKHYANK MORCHA KARYAKRAMराजतंत्र न्युज नेटवर्क
            तारापुर, दि. १५ : भाजपा अल्पसंख्यांक मोर्चातर्फे येथील ताजिया मोहल्ला येथे जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्हा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे महामंत्री आषाद बी. शेख यांनी उपस्थितांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध याजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. भाजपाच्या रोजीहा मोहम्मद अली शेख, भाजपाचे पालघर तालुका उपाध्यक्ष सलीम गवंडी, युवा मोर्चा उपाध्यक्ष अबू गवंडी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहूण म्हणून उपस्थित अल्पसंख्यांक मोर्चा पालघर जिल्हा अध्यक्ष मेराज खान यांनी उपस्थितांशी संवाद साधुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी रोजीहा मोहम्मद अली शेख यांची पालघर जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चाच्या महिला उपाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा खान यांनी केली. कार्यक्रमास पालघर अल्पसंख्यांक मोर्चाचे नजैर जमादार, महासचिव गुलाम शेख, कोषाध्यक्ष अहमद काजी, जावेद मुजावर, भाजपाचे पालघर तालुका उपाध्यक्ष सलीम गवंडी यांच्यासह तारापुर सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्टी शब्बीर गवंडी, माजी ट्रस्टी शब्बीर शेख, इसमुद्दीन शेख, फरुखभाई दमणवाला, जुनेद गुलाम नबी मुल्ला, हसन शेख, कासिम शेख, जैनुल मुछाले, पप्पू शेख, रिजवान शेख, मोहम्मद अली शेख, चेलाराम चौधरी, सौ. माया प्रजापती व इतर मान्यवर उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top